नागपूर : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद आणि शहरादरम्यानचा प्रस्तावित महामार्ग (expressway) विकसित झाल्यानंतर नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. या महामार्गाचे (expressway) काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी ?
नियोजित एक्स्प्रेस वे (expressway) कनेक्टिव्हिटीमुळे नागपूर ते पुणे सुमारे 720 किलोमीटरच्या प्रवास आता केवळ 6 तासांत करता येणार आहे. “पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबाद ते पुणे हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरु होणार आहे. तसेच आम्ही महाराष्ट्रात आणखी 6 द्रुतगती महामार्ग (expressway) बांधत आहोत. औरंगाबाद-पुणे ग्रीन एक्स्प्रेस वे पुण्याला 701 किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणार आहे.
अनेक रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. PM मोदींनी रविवारी भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी (expressway)एक, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेच्या फेज-1 चे उद्घाटन केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून नावाजलेला हा एक्स्प्रेसवे (expressway) 701 किमी अंतराचा आहे. समृद्धी महामार्ग ‘पीएम गति शक्ती’ उपक्रमांतर्गत दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, तसेच अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार या पर्यटन स्थळांना आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जोडणार आहे.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट