आधारमध्ये नाव, पत्ता आणि DoB बदलायचा असेल तर फॉलो करा ‘ही’ पद्धत; त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता किंवा जन्मतारीख तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यासाठी आज आम्‍ही तुम्‍हाला एक ऑनलाइन पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्‍ही घरबसल्या आधार कार्डमध्‍ये होणारी प्रत्येक चूक सुधारू शकाल.

आधार कार्डमध्ये दुरुस्ती कशी करायची ते जाणून घ्या
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील, तर तुम्हाला सर्वात आधी आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल http://uidai.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Update Your Aadhaar या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.

पत्ता, नाव आणि जन्मतारीख याप्रमाणे अपडेट करा
Update Your Aadhaar या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमच्या आधारमध्ये अपडेट एड्रेस खाली दिलेल्या Update Demographics Data Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला नाव, जन्मतारीख, Gender, Address आणि Language Online लिहिलेली दिसेल आणि त्याखाली आधार अपडेट करण्यासाठी Proceed To Update Aadhaar वर क्लिक करा.

आता एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तेथे Captcha दिलेला असेल. Captcha भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला Update Demographics Data वर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला जो डेटा बदलायचा असेल तो डेटा बदला आणि Proceed वर क्लिक करा. तसेच तुम्हाला जी चूक सुधारायची आहे त्याच्याशी संबंधित एक डॉक्यूमेंट अपलोड करा.

‘हे’ डॉक्युमेंट्स स्वीकारले जातील
UIDAI नुसार, आधारमध्ये Proof Of Identity साठी 32 डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात. Proof Of relationship साठी 14, DOB साठी 15 आणि Proof of Address (PoA) साठी 45 डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात.