महाविकास आघाडी फुटणार?? काँग्रेसकडून स्पष्ट संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बीघाडी होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची निवड केल्याने काँग्रेस नाराज झाली असून हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर आमची आघाडी हि नैसर्गिक नाही असं विधान त्यांनी केल्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का ?? अशा चर्चा रंगल्या आहेत .

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडी हि काय परमनंट आघाडी नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने लोकशाहीचा तमाशा मांडला होता. त्यामुळे अत्यंत विपरीत परिस्थितीत आम्ही महाविकास आघाडी मध्ये सामील झालो. खरं तर आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण महाविकास आघाडी ही काय नैसर्गिक आघाडी नाही असे नाना पटोले यांनी म्हंटल. त्यामुळे आता राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त केली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याच थोरात म्हणाले. मात्र शिवसेनेकडून आपल्याला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप आहे . आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोललं पाहिजे, असे म्हणत बाळासाहेब थोरातानी आपली नाराजी व्यक्त केली.