भाजपकडून पेशवाईप्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिह कोश्यारी, भाजपचे नेते त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधाने केली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्यात पेशवाई आणि शिवशाही या दोन गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा रोज अपमान करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. राज्यात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेकदा अपमान करणे म्हणजे ही पेशवाई आहे,” अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी पटोले म्हणाले की, आता पेशवाई आणि शिवशाही या दोन गोष्टींची निवड करण्याची वेळ आली आहे. कारण ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान करण्याचे काम राज्यपाल आणि भाजप पूर्वजते सुधांशु त्रिवेदी करत आहेत.

त्रिवेदींनी तर अवमानच कळसच गाठला आहे. त्यांनी छत्रपती असा शब्द न वापरता शिवाजी असा शब्द वापरला. हे बोलताना त्यांची जीभ का घसरली नाही. पण महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या नावाने मते मागणाराही एक वर्ग आहे.

आज भाजपमध्ये जे काही पन्नास लोक गेले आहेत त्यांचाही यामध्ये समावेश होतो. भाजपचे प्रवक्ते जेव्हा भाजपचे मत मांडतात. कि हे माफिवीर आहेत. आणि तोच शब्दार्थ छत्रपतींना लावण्यात आलेला आहे. हि तर यांची पेशवाई आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशव्यांनी अनेकदा अपमान केला. आता पेशवाई आली का? मग आता पेशवाईसोबत शिंदे गटातील आमदारांनी राहायचे कि नाही हे ठरवावे. ज्यांना छत्रपतींबद्दल थोडेजर भान असेल तर आपल्या पदाचे खासदार, आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

सरकार पडल्यावरच त्यांना अक्कल येईल. त्यांचे डोके ठिकाणावर येईल. आम्ही मात्र शिवशाहीसोबत असून काँग्रेस पक्षाची एकदम भूमिका स्पष्ट आहे. आम्ही पेशवाईबरोबर नाही. ज्याला राहायचे असेल पेशवाईबरोबर ते दिसेल. आणि महाराष्ट्रातील जनता त्याला योग्य धडा शिकवेल, असा आमचा विश्वास असल्याचे पटोले यांनी म्हंटले.