नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी पटोलेनी फडणवीस यांची भेट घेतली आहे.

कांँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आलीय. हीच निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यापूर्वीदेखील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या ६ जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आलाय.

कोणत्या ६ जागांसाठी निवडणूक होणार?

भाई जगताप, काँग्रेस, मुंबई
रामदास कदम, शिवसेना, मुंबई
सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर
गिरिश व्यास, भाजप, नागपूर
अमरीश पटेल , भाजप, धुळे-नंदुरबार
गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना अकोला, बुलढाणा, वाशिम

Leave a Comment