नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याने खासगी ट्यूशन क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सतीश नरंगळे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हा आरोपी शिक्षक नांदेडमधील काबरानगर भागात खासगी शिकवणी वर्ग चालवतो. पीडित मुलगी ही आरोपी नरंगळे यांच्याकडे खासगी शिकवणीसाठी जायची. यावेळी आरोपी शिक्षकाने अश्लील स्वरुपाचे चाळे केल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीच्या आईने केली आहे. या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेडमध्ये बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खासगी ट्यूशन क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपी शिक्षक सतीश नरंगळे याला अटक केली आहे. आरोपी नांदेडमधील काबरानगर भागात खासगी शिकवणीचे वर्ग चालवतो. पीडित मुलगी हि या आरोपी शिक्षकाकडे खासगी शिकवणीसाठी जात असे.
शिक्षकाचे अश्लील चाळे, पीडितेच्या आईची तक्रार
आरोपी शिक्षकाने आपल्या मुलीसोबत अश्लील स्वरुपाचे चाळे केले असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने केली आहे. यानंतर भाग्यनगर पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. महिला दिनालाच हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.