नांदेड : हॅलो महाराष्ट्र – सध्या अपघाताच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. काल रात्री नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर देखील भीषण (Accident) अपघात झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. हा अपघातात (Accident) इतका भीषण होता की, यामध्ये पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके ?
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारी फाटा करंजी जवळ ट्रक आणि आयशर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात (Accident) झाला. हा अपघात इतका भीषण होता की जागीच पाच लोकांचा मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने उपचारासाठी हिमायतनगर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती हे मजूर म्हणून काम करत होते. हे मजूर बिहारमधून महाराष्ट्रात कामासाठी आले होते.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर परिसरात ते वास्तव्यास होते. आपले काम आटपुन रात्रीच्या वेळेला हे मजूर परत आपल्या घरी निघाले होते. दरम्यानच हा अपघात (Accident) झाला. या अपघाताची (Accident) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची अधिक तपासणी पोलीस निरीक्षक बीडी भुसनुर, सहायक पोलीस निरीक्षक महाजन यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी करत आहेत.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर