पोलीस घरच्या भांडणात लक्ष घालत नाही म्हणून एका व्यक्तीचा SP कार्यालयासोमर आत्मदहनाचा प्रयत्न

Nanded
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये (Nanded) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये घरगुती वादाकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एका नागरिकाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर स्वतःला पेटवून घेतले आहे. कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच आवरल्याने पेटवून घेणारा नागरिक थोडक्यात बचावला आहे. यामध्ये या व्यक्तीचे शरीर भाजल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिराजी मडपल्लेवार असे या व्यक्तीचे नाव असून तो मुदखेड तालुक्यातील मुगट जवळच्या खांबाळा गावातील रहिवाशी आहे. त्याने किरकोळ घरगुती वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर त्याने तातडीने कारवाई होत नसल्याचे पाहून त्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत स्वतःला पेटवलं.

एसपी ऑफिस किती सुरक्षित?
नांदेडचे (Nanded) एसपी ऑफिस हे वजीराबाद इथल्या मुथा चौकात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. इथून जवळच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , बसस्टँड , रेल्वेस्टेशन आणि वजीराबाद पोलीस ठाणे आहे. यामुळे आजूबाजूला काहीही घटना घडली की लोक तात्काळ न्याय मिळवण्याच्या हेतूने एसपी ऑफिसला जात असतात. यामुळे पोलिसांनी एसपी ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचीच नोंद ठेवण्यास सुरुवात केली. यामुळे एसपी ऑफिसमध्ये येणारी गर्दी थोडी कमी झाली. मात्र तरीही आज सांयकाळी चार वाजण्याच्या आसपास आग लावून घेतल्याची घटना घडल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना
थेट एसपी ऑफिसमध्ये येऊन स्वतःला पेटवल्याची नांदेडमधली (Nanded) आजची काही पहिली घटना नाही. यापूर्वीसुद्धा अशीच एक घटना घडली होती. यामध्ये एका वर्षांपूर्वी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न मुखेडच्या एका शेतकऱ्याने केला होता. त्या नंतर संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीची व्यवस्थित नोंद आवक जावक विभागात ठेवण्यात येऊ लागली. मात्र तरीही आज जी घटना घडली त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :
आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा

SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा

LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ???

ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली