हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन : नारायण राणे यांच्या अटकेमुळे मंगळवारचा दिवस विशेष चर्चेत राहिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणेंना अटक होणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. त्यानंतर चिपळून येथे राणे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. प्रथमच देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली.
नारायण राणे यांना चिपळून येथे अटक केल्यानंतर त्यांना महाड येथे हलवण्यात आले. सुरवातीला न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. त्यानंतर रात्री उशीरा राणेंच्या निकालाची सुनावणी झाली. यावेळी राणेंच्या वकिलाने राणेंच्या तब्ब्येतीची सबब देत त्यांना जामिन मिळावा अशी मागणी केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांची बाजू समजावून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
राणे यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी मी काही साधारण माणूस नाही असे वक्तव्य केले होते. मात्र राणेंना अटक झाल्यानंतर त्यांना जामिनासाठी प्रयत्न करावे लागले. जामिन मिळाल्यानंतर रात्री उशीरा राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. केवळ दोन शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले. ट्विट करुन राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सत्यमेव जयते अशा आशयाचे ट्विट राणे यांनी केले.