हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांची संतोष परब हल्ल्यावरून पोलिसांची चौकशी सुरु असतानाच नितेश राणे हे सध्या अज्ञातवासात असल्याचे समजत आहेत. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे याना विचारलं असता त्यांनी थेट पत्रकारावरच संताप व्यक्त केला. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय असे राणे म्हणाले
नितेश राणे सध्या कुठे आहेत असा सवाल एका पत्रकाराने नारायण राणे याना केला असता, तुम्ही कोण आहात?? हा काय प्रश्न असतो का असे म्हणत नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय अशा शब्दात नारायण राणे यांनी आपला संताप व्यक्त केला. मला जरी माहित असलं तरी नितेश कुठे आहे हे मी सांगणार नाही असेही राणे म्हणाले.
नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘ पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं? एक खरचटलं… मारहाण झाली मग एवढे पोलीस का? असे म्हणत या संपूर्ण प्रकरणात नितेश राणे यान अडकवण्यात येत आहे असा आरोप राणेंनी केला .