हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेना यांच्यात अनेक दिवसापासून एकमेकांवर टीकाटिप्पणी केले जात आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावर शिवसेनेचे अग्रलेखातुन राणेंवर टीका करण्यात अली होती. त्या टीकेला राणे यांनी ‘प्रहार’मधून प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत मुळात शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत नव्हते. अनेक शिवसैनिकांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडली. म्हणूनच आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’ आहेत. त्यातील एक संजय राऊत !”, अशी टीका राणेंनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या प्रहारमधील अग्रलेखात म्हणाले की, ” शिवसेनेचे चांगले दिवस आले तेव्हा ‘सामना’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा राऊत शिवसैनिक झाले. आज ते जशी आमच्यावर टीका करताहेत तशी टीका एकेकाळी शिवसेनेवर करत होते, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे माहीत नाही. कोकणात हत्या झाली त्यांची यादी छापली. कोकणात शिवसेनेमुळे दहशत, खून, अपहरण असे प्रकार वाढले असणारे म्हणणारे राऊतच आहेत.
शिवसेनेच्या जन्मापासून लाखो तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शिवसैनिक झाले. मात्र, आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’ आहेत. त्यातील एक संजय राऊत होय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतरचे माझे एक वाक्य राऊतांच्या जीवाशी लागले. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली, आता महाराष्ट्राकडे पाऊल, असे मी म्हण्टल्याने राऊत अस्वस्थ झाले असल्याचे राणे यांनी म्हंटले आहे.