“…तर मग ईडीने गप्प न बसता संजय राऊतांची पूजा करावी” – नारायण राणे

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत घणाघाती टीका केली. काल संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांवर राऊतांनी जे आरोप केले आहेत. ते कोणत्या आधारावर केले आहेत. इडीनेही आता गप्प बसू नये राऊतांना आतमध्ये घ्यावे आणि त्याची पूजा करावी, असे राणे यांनी म्हटले.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यावर संजय राऊतांनी जे काही कालच्या पत्रकार परिषदेतून आरोप केले आहेत. ते बिन बुडाचे आहेत. त्यांना एक आरोप झाला म्हणून काल पत्रकार परिषद घेत असताना घाम फुटला. त्यांनी जास्त ईडीच्या नाडी लागू नये. नाहीतर ईडी तुम्हाला बिडी प्यायला लावेल, असे राणे यांनी म्हंटले.

यावेळी राऊतांवर घणाघाती टीका करताना राणे म्हणाले की, बाळासाहेबांचे आशिर्वाद आहे असे म्हणणारा राऊत शिवसेनेत 1992 मध्ये आला. राऊत यांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेणे थांबवावे आणि जे ओढावले आहे, त्याला सामोरे जावे, असा सल्ला राणेंने राऊत यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here