एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’, नारायण राणेंनी हसत हसत दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

narayan rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. काल सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे पक्षाच्या संपर्कात नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याच पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदारांची दुपारी १२ वाजता बैठक बोलावली आहे. यावर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर हसत हसत प्रतिक्रिया दिली आहे.

काल सायंकाळपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचा मुद्दा उपस्थित करत नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कालपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचे समजले. ते कुठं आहेत असं सांगायचं नसतं. आता राज्यात राहील काय आहे.

“आज योग दिन आहे. ७५ ठिकाणी साजरा झाला आहे. जनतेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा योगा दिन साजरा केला जातोय. त्याने प्रतिकार शक्ती वाढते. देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं राहिलंय काय? काँग्रेस संकुचित होत चाललीय. केवळ बोलतात, त्यांचं अस्तित्व राहील नाही. देशात त्यांचे नेते, कार्यकर्ते काम करत नाहीत. त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश राहिला नाही त्यामुळं त्यांचा पराभव झाला,” असं राणे म्हणाले.

शाब्बास एकनाथ शिंदे….

दरम्यान मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे याच्या यांना शुभेच्या दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असे राणे यांनी म्हंटले आहे.