..तर घर गाठणे कठिण होईल; राणेंची शरद पवारांना धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना किंमत चुकवावी लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकी दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांना धमकी दिली आहे.

माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल असे ट्विट नारायण राणे यांनी केलं.

आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या एकूण परिस्थिती वरून खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा असा टोला राणेंनी लगावला.