व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फास्ट ट्रेनला लटकलेल्या तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे अपघाताचा (railway accident) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं वारंवार आवाहन केले जाते मात्र तरीही काही अतिउत्साही तरुण ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करत असतात. याचा परिणाम अनेक अपघातात प्रवाशांचा (railway accident) मृत्यू होतो. त्यामुळे कोणीही नको तो स्टंट करू नये असं सांगितले जाते.

अपघातचा व्हिडिओ आला समोर
दादरला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक तरुण गाडीतून खाली पडला (railway accident). यावेळी गाडीची गतीही जास्त होती. आज साधारण 9.30 वाजता कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. या अपघातात (railway accident) तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चालत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे (railway accident) रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं आवाहन केले आहे.

हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट

अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!