Wednesday, October 5, 2022

Buy now

मग कळेल, दाऊदशी संबंध कोणाचे आहेत; राणेंचा नवा बॉम्ब?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध जोडल्यानंतर भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे एक ट्विट करत नवा बॉम्ब फोडला आहे. व्होरा समितीचा निकाल मागवला की कळेल की दाऊदशी कोणाचे संबंध आहेत असे म्हणत राणेंनी खळबळ उडवून दिली आहे.

जनता किंवा विरोधक यांच्या टीकेचे खंडन करणे हे सत्तारूढ पक्षाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्यांच्या विरोधात FIR दाखल करणे, याला सत्तेचा दुरुपयोग म्हणतात. केंद्र सरकारच्या व्होरा समितीचा निकाल राज्य सरकारने मागवावा. त्यात कळेल कोणाचे दाऊदशी संबंध आहेत असे नारायण राणे यांनी म्हंटल.

राणें बंधूंवर गुन्हा दाखल-
दरम्यान, निलेश राणे यांनी शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडला होता त्यांनतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य़ करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला दाखल केला आहे