राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे.., शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

0
1
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वर्तुळात वादविवाद निर्माण झाले आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी देखील महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर टीका केली आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकांनंतर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी,”संजय राऊत महामूर्ख माणूस असून त्यांनी मूर्खाचाही कळस गाठला आहे. त्यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे” अशी खोचक टीका केली आहे.

नितेश राणे यांनी संजय राऊत यांना शक्ती कपूर म्हणून संबोधल्यानंतर त्यावर नरेंद्र भोंडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी म्हणले आहे की, “राऊत यांना शक्ती कपूरपेक्षाही मोठी उपाधी द्यायला पाहिजे, इतके मोठे महामूर्ख संजय राऊत आहेत. शक्ती कपूर त्यांना शोभत नाहीत, महिला आरक्षण विधेयकावर राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे महिलांचा अपमान आहे. ज्यापद्धतीनं राऊतांनी वक्तव्य केलं आहे, त्यानं समाजातील महिलांचा अपमान झाला आहे”

त्याचबरोबर, “एकीकडे 454 मतांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. यामध्ये सर्वपक्षीय खासदारांनी मतदान केलं. म्हणजे, त्यामध्ये शिवसेनेचेही खासदार आहेत, ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिलं. त्यामध्ये संजय राऊत एकटेच विरोध करतात, म्हणजे यानं मुर्खाचाही कळस गाठला आहे. त्यामुळे यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे” असं वक्तव्यं नरेंद्र भोंडेकर यांनी केलं आहे.

नितेश राणे यांची टीका

महिला आरक्षणाच्या विरोधात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी, “महिला आरक्षण विधेयकावर बोलताना संजय राऊत यांनी त्यात नवीन काय? असं वक्तल्य केलं होतं. जे संजय राऊत स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात शक्ती कपूरसारखा वागतो. जी व्यक्ती महिलेला धमकी देते, तिला महिला आरक्षण विधेयक कसं कळणार? जेव्हा हे विधेयक संसदेत येईल, तेव्हा या संजय राऊत आणि त्याच्या मालकाच्या मुलासारखे शक्ती कपूर यांना जेलमध्ये जावं लागेल” असे म्हटले होते.