पंतप्रधान मोदींच्या एका तिकीटावर बाकी नेत्यांचा फुकट मेट्रो प्रवास ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करत त्यांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन केले त्यानंतर मोदींनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढले आणि आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या राज्यपालांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांच्यासह मान्यवरांनी फुकट प्रवास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. ग्रीन सिग्नल देत त्यांनी मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वनाझ ते गरवारे महाविद्यालयापर्यंंतचा प्रवासही केला. या प्रवासावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. दरम्यान प्रवास करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रथम मेट्रोचे तिकीट काढले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/379160607378834

पुण्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या मेट्रोतून सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पुणे शहरात वनाझ ते रामवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास करण्यासाठी पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये इतकी तिकीटाची रक्कम आहे. म्हणजे वनाझ ते गरवारे स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागणार आहेत. तर पिंपरी- ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी वीस रुपयांचे तिकीट असेल.

Leave a Comment