हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. अशात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना इंधनावरील दरवाढीवरील कर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांनी ते केले नाही. यावरून आज पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता ठाकरे सरकारवर निशाणा साधला. गुजरात, कर्नाटकच्या शेजारील राज्याने सहा महिन्यात साडे तीन हजार कोटींपासून ते 5 हजार कोटी रुपयांपर्यंत पैसे कमावले असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोदींनी इंधन दरवावाढीवरून ठाकरे सरकारवर नाव न घेता आरोप केले. यावेळी मोदी म्हणाले की, सहा महिन्यानापूर्वी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा व्हॅट कमी करण्याबाबत मी म्हंटले होते. मात्र, गुजरात, कर्नाटकच्या शेजारील काही राज्यांनी व्हॅट कमी न करता 5 हजार कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त राजस्व कमावले.
मी कोणावरही टीका करत नाही. तुमच्या राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहे. सहा महिन्यांपूर्वी मी सांगितलेली मान्य केली. मात्र, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी या ना त्या कारणाने सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. त्याचा नागरिकांवर बोजा पडत राहिला. आता मी तुम्हाला प्रार्थना करतो की, गेल्या नोव्हेंबरमध्ये देशाच्या हितासाठी जे करायचे होतं त्याला सहा महिन्यांनी उशीर झाला आहे. व्हॅट कमी करुन जनतेला फायदा द्या, असे मोदी यांनी म्हंटले.
इंधन दरवाढीतील तफावतीची यादी दाखवली वाचून –
यावेळी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात इंधन दरवाढीच्या आलेल्या किमतीतील तफावतीची यादीच वाचून दाखवली. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रासह इतर राज्यांनी इंधनावरील कर कमी करुन नागरिकांना त्याचा लाभ द्या. माझे सर्व राज्यांना आवाहन आहे की, वैश्विक संकटाच्या काळात एक टीम म्हणून आपण काम करावंवे.आज चेन्नईत पेट्रोल 111 रुपये, जयपूरमध्ये 118 रुपये प्रति लिटर, हैदराबाद 119 हून अधिक, कोलकातामध्ये 115 हून अधिक, मुंबईत 120 हून अधिक आहे. तर ज्यांनी कपात केली आहे त्या ठिकाणी म्हणजेच मुंबईच्या शेजारी दीव दमण मध्ये 102 रुपये इतका दर आहे. कोलकातात 115 तर लखनऊमध्ये 105 रुपये दर आहे. जयपूरमध्ये 118 तर गुवाहाटीत 105 रुपये प्रति लिटर आहे, असे मोदी यांनी यावेळी म्हंटले.