नरेंद्र मोदींच्या आईंची प्रकृती खालावली; अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांच्या कुटूंबावर सध्या संकटेच संकटे येत आहेत. काल त्यांच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे या अपघातात कुटुंबातील काहीजण जखमी झाले. तर आज मोदींच्या आईची प्रकृती खालावली आहे. मोदींच्या आई यांना प्रकृतीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, हिराबा यांनी कहाणी महिन्यापूर्वी म्हणजे 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता आई हीराबा यांना भेटण्यासाठी ते गांधीनगरला पोहोचले होते, जिथे त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते.

त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत खिचडी खाल्ली होती. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांच्या आईची भेट घेतली. त्यावेळी पीएम मोदी त्यांच्या आईशेजारी बसलेले दिसले. तसेच पंतप्रधान मोदींनीही तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर आज मोदींच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.