Maratha Reservation : मला तर आता जगायचीसुद्धा इच्छा राहिली नाही; नरेंद्र पाटील झाले भावूक

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणाच्या निकालावर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी भावुक होऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज जो निकाल आला तो अतिशय धक्कादायक आहे. आशा होती कि या निकालानंतर मराठ्यांना न्याय मिळेल पण आपले दुर्भाग्य. माझ्या वडिलांनी याच मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे.

या मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन झाले. तेव्हा ४२ जणांनी आपले प्राण दिले. काँग्रेस पक्षाने आपल्या राज्यकाळात कधीहि मराठा आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका मांडली नव्हती. ज्यामुळे आम्हाला जी भीती होती तीच खरी ठरली. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा बांधवाना दिलेले आरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले आहे.

सकाळपासून मी बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्यामध्ये शांत राहा, आराम करा, झोपून राहा, कोरोना आहे, हा कोरोना दोन वर्षे चालणार आहे. MPSC,UPSCच्या परीक्षा देऊ नका. मराठा आरक्षणाच्या विषयावरती कोणीही बाहेर पडू नका अशाच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. कसले तुम्ही नेते त्यापेक्षा तुम्ही टाळ वाजवा. आता तर मला जगायची देखील इच्छा राहिली नाही हे सांगताना माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील भावुक झाले.

You might also like