हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साताऱ्याच्या तुतारीच्या उमेदवाराने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला असं म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. शशिकांत शिंदेंवर एपीएमसी मार्केट गाळे विक्रीवरून तब्बल ४००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कट्टर विरोधक महेश शिंदे यांनी केला होता. याच धागा पकडून नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच 2019 ला त्यांनी आमच्या काही सहकार्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात जे काही कटकारस्थान लादलं त्याच रिटर्न गिफ्ट त्यांना देण्याची संधी आली आहे असं म्हणत थेट इशाराही दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे लांच्छनास्पद आहे, याबाबत वाईट वाटत. अशा व्यक्तींना जर उमेदवारी मिळत असेल तर पवार साहेबाना आम्ही काय म्हणणार? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी मला बेंबीच्या देठापासून प्रत्यक्षात विरोध केला. माथाडी चळवळीत काम केल्याने माझ्या परिवाराने त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्याच्या विजयाच्या दृष्टीने कामं केलं. त्यांचा शेवटचा विजय कोरेगाव मतदार संघातून झाला. परंतु 2019 ला त्यांनी आमच्या काही सहकार्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात जे काही कटकारस्थान लादलं त्याच रिटर्न गिफ्ट त्यांना देण्याची संधी आली आहे. अजून निवडणुकीला बराच काळ आहे, तोपर्यंत आपण एकेकी उलगडा करू असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून लव्ककरच उमेदवार जाहीर करण्यात येईल. भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले, मी स्वतः, धैर्यशील कदम आणि अजून काही उमेदवार इच्छुक आहेत. मला विश्वास आहे कि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे साताऱ्याच्या जनतेचा कौल घेऊन चांगला उमेदवार देतील, मग तो उमेदवार महायुतीतील कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही चिन्हाचा असो …. मतदारापर्यंत पोचणं महत्वाचे आहे असं नरेंद्र पाटील यांनी म्हंटल.