धक्कादायक ! नाशिकमध्ये RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात प्रशांत जाधव हे जखमी झाले आहेत. नाशिक शहरातील सिडको भागात असलेल्या उपनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली.जखमी प्रशांत जाधव यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले आणि एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर नाशिकमधील एका मेडिकल स्टोअरजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशांत जाधव जखमी
या हल्ल्यामध्ये प्रशांत जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली आहे. हा गोळीबार नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासाठी पोलीस परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या हल्ल्यामुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.