अँटी डोपिंग संस्था ‘नाडा’ने पुजारा, जडेजा, केएल राहुलसह ५ क्रिकेटपटूंना बजावली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊन असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ५ क्रिकेटपटूच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था अर्थात नाडाने संबंधित खेळाडूंना नोटीस बजावली आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रविंद्र जडेजा या पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश असलेल्या या ५ क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती न दिल्याबद्दल नाडाने नोटीस दिली आहे. हे ५ खेळाडू जे एनआरटीपीच्या ११० खेळाडूंमध्ये आहेत. बीसीसीआयने या खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती दिली नसल्याने स्पष्टीकरण मागितले आहे, असे नाडाचे नवीन अग्रवाल यांनी सांगितले.

म्हणून ‘नाडा’ने बीसीसीआयला मागितलं स्पष्टीकरण
एनडीएएमएसच्या सॉफ्टवेअरमध्ये आमच्याबद्दल जाणून घ्या (KYC) यासंदर्भातील जो अर्ज आहे तो भरण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर खेळाडू स्वत: ते भरू शकात किंवा त्याच्या संघटनेकडून फॉर्म भरणे अपेक्षित असते. काही खेळाडू इतके शिकलेले नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेट नसते. त्यामुळे ते हा फॉर्म भरू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना संबंधित संघटनेची मदत घ्यावी लागते. त्यामुळेच संबंधित खेळाडूंची संघटना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती अपलोड करतात. अनेक वेळा क्रिकेटपटूंना देखील हा माहिती भरताना अडचणी येतात. क्रिकेटला देखील असाच नियम लागू आहे. पण संबंधित क्रिकेटपटू शिक्षित आहेत. कदाचित त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा अन्य काही कारण असेल. त्याच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती देण्याची जबाबदारी बीसीसीआयने घेतली होती. पण गेल्या ३ महिन्यांपासून ही माहिती दिली गेली नाही.

बीसीसीआयने दिलं ‘हे’ शुल्लक कारण
५ क्रिकेटपटूंची माहिती दिली गेली नाही यासाठी बीसीसीआयने पासवर्डमध्ये गोंधळ झाला, असे कारण दिले. आता हा प्रश्न मिटवण्यात आला असून यावर बीसीसीआयशी चर्चा केली जाईल. माहिती देण्यास असमर्थ ठरल्याच्या ही तीन पैकी पहिली चूक मानली जाईल. यापुढे बीसीसीआय कशी भूमिका घेते हे पाहावे लागले, असे अग्रवाल म्हणाले.कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न देण्याची चूक तीन वेळा केली तर २ वर्षाची बंदी घातली जाऊ शकते.

तर बीसीसीआयने ‘हे’ का केलं नाही?
खर तर हा लॉकडाऊनचा कालावधी होता. संबंधित खेळाडू घरीच होते. त्यातील अनेक जण इस्टाग्राम आणि पॉडकास्ट करताना दिसत होते. जर बीसीसीआयला पासवर्ड संदर्भात काही अडचणी येत होत्या तर त्यांनी संबंधित खेळाडूंना माहिती भरण्यास सांगितले पाहिजे होते. कदाचित यावेळी नाडा ही गोष्ट फार गंभीरपणे घेणार नाही. पण भविष्यात ही गोष्टी अडचणीची ठरू शकते, असे बीसीसीआयमधील एका अनुभवी अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in