नवी दिल्ली |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातील दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी अपक्ष उमेदवार ध्रुवलाल आणि बहुजन मुक्ती पक्षाचे उमेदवार अफजाल वारिस यांनी केली आहे. अमेठी येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कडे या दोन उमेदवारांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.
Ravi Prakash, lawyer of independent MP candidate from Amethi, Dhruv Lal who has raised objections on Rahul Gandhi's nomination papers: On basis of certificate of incorporation of a company registered in UK, he declared himself a UK citizen. A non-citizen can't contest polls here. pic.twitter.com/A8ifZgbGhC
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 20, 2019
अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञपत्राचा नोटरी स्टॅम्प दिल्लीचा आहे. जो कि अमेठीचा असायला हवा होता. तसेच राहुल गांधी यांनी स्वताच्या शैक्षणिक पात्रतेची देखील माहिती उचित भरलेली नाही. ती अपूर्ण आहे असा आरोप सदरच्या दोन उमेदवारांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण हि चुकीच्या स्वरुपात मांडण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी स्वताच्या संपतीच्यातपशिलाची माहिती देताना स्थिर संपत्तीचा रकाना रिकामा सोडला आहे. तसेच राहुल गांधी यांनी एका कंपनीच्या व्यवहारात स्वताला ब्रिटनचे नागरिक संबोधले आहे. त्यामुळे ते भारतीय नागरिक कसे होऊ शकतात असा आक्षेप अमेठी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी घेतला आहे. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या दोन्ही उमेदवारांचे मत निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणून घेतले असून राहुल गांधी यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी २२ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
गुराखी ते कॅबिनेट मंत्री! महादेव जानकरांची थक्क करणारी कहाणी
धक्कादायक! लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘त्याने’ संपविले जीवन
दोन दुचाकीच्या आपसात झालेल्या अपघातात २ ठार
धनगर समाज माझ्याच पाठीशी आहे : महादेव जानकर
गोपीचंद पडळकरांमुळे धनगर समाजाची फसवणूक झाली : प्रतिक पाटील