चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत

इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.

अमेरिकन आयोगाचा नागरिकत्व विधेयकावर तीव्र आक्षेप,अमित शहांवर निर्बंध लादण्याची केली मागणी

तब्बल आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी मंगळवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आज केंद्र सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे. मात्र या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायदा मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल. अशा तरतुदी असणारे हे विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.

‘मी स्वप्नात बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार’; राऊतांच्या दिलखुलास गप्पा

पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून गृहमंत्री अमित शहांवर लोकसभेत जोरदार टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी याविधेयकाला जोरदार विरोध केला असून, हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधी असल्याचा सरकारवर आरोप केला हे आहे.

संसदेत पुन्हा खडाजंगी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडणार

मागील सहा दशकांपासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यासाठीचे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी लोकसभेत मांडतील आणि ते संमत करण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करण्यात येईल, असे लोकसभेच्या सोमवारच्या कामकाजपत्रिकेत म्हटले आहे.

बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केला. त्यानंतर देशभरात हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले. मात्र समाजातील काहींनी पोलिसांच्या सदर कृत्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यावेळी बलात्कार्‍यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता … Read more

नित्यानंदचा पासपोर्ट सरकारकडून रद्द, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

वादग्रस्त स्वघोषित स्वामी नित्यानंद याचा पासपोर्ट केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रद्द केला आहे. तसेच नव्या पासपोर्टसाठी त्याने केलेला अर्जही फेटाळला आहे. नित्यानंदला आश्रय दिल्याचा इन्कार इक्वेडोरच्या सरकारनेही केला आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उन्नाव सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच जणांनी पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. यात ती ९० टक्के भाजली होती. सफदरजंग रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बलात्काराला पॉर्न साईटस जबाबदार – नितीश कुमार

महिलांविरोधातील वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी पॉर्न साईटस जबाबदार असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी इंटरनेटवरील अशा सर्व पॉर्न साईटसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील बक्सर आणि समस्तीपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका

जम्मू आणि काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ५ ऑगस्ट रोजी हटवण्यात आल्यानंतर, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून केंद्राच्या निर्बंधांनंतर काश्मिरातील हस्तव्यवसाय, पर्यटन आणि ई-कॉमर्स या व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, असा दावा काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक हुसेन यांनी केला आहे.