आठवण भारताच्या ‘मिसाईल मॅन’ची; अब्दुल कलामांचा आज ८८ वा जन्मदिवस

”आपल्या यशाची पाऊले जर भक्कम असतील तर आपण नेहमीच अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू” हे शब्द आहेत जगप्रसिद्ध महान शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांचे. आपल्या प्रेरणादायी आयुष्याने आणि अलौकिक व्यक्तिमत्वाने त्यांनी कोटयावधी युवक आणि नागरिकांच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. देशाचे ‘मिसाईल मॅन’ अशी ओळख असलेल्या अब्दुल कलाम यांचा आज ८८ व जन्मदिवस. जगभरासहित देशभरातून त्यांना आज श्रद्धांजली दिली जात आहे.

‘गौतम गंभीर’चं अभिमानास्पद पाऊल; १०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

मोदींच्या साफसफाईवर प्रकाश राज यांचा मिश्किल प्रश्न; सुरक्षा यंत्रणांना धरले धारेवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडूमधील महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक वेचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मात्र, यावरून सुरक्षा यंत्रणांना धारेवर धरले आहे. प्रकाश राज म्हणाले, “आपल्या नेत्याची सुरक्षा कुठे आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना स्वच्छता करण्यासाठी एकट का सोडलं. तेही एका कॅमेरामॅनसोबत. परदेशी शिष्टमंडळ भेटीवर येणार असतानाही संबंधित विभागाने स्वच्छता का केली नाही. त्यांची हिंमत कशी वाढली, “असा सवाल त्यांनी केला.

देशाची अर्थव्यवस्था संकटात; अर्थमंत्र्यांच्या पतींचा घरचा आहेर

‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा नीचांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे ”. असा घरचा आहेर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतींनी मोदी सरकारला दिला.

भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा करुण अंत

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. ध्यानचंद्र ट्रॉफी खेळण्यासाठी जाताना हा अपघात घडला. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ आज (सोमवारी) सकाळी हा अपघात झाला.

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

काश्मीरमध्ये आजपासून ‘पोस्टपेड मोबाइल’ सेवा पूर्ववत

काश्मीर खोऱ्यात गेले ६९ दिवस संचारमाध्यमांवर असलेले निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, या ठिकाणचे सुमारे ४० लाख पोस्टपेड मोबाइल दूरध्वनी सोमवार दुपारपासून कार्यरत होतील, असे जाहीर केले आहे. देशभर दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या श्रीनगरमधील पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव व प्रवक्ते रोहित कन्सल यांनी ही घोषणा केली. तथापि, २० लाखांहून अधिक प्रीपेड मोबाइल दूरध्वनी, तसेच मोबाइल व इतर इंटरनेट सेवा सध्या बंदच राहणार आहेत.

मतदारांनो जादूचे प्रयोग बघा; बसपाकडून वाशिममध्ये अनोखा प्रचार

मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे.

गांधीजींनी आत्महत्या कशी केली? गुजरातमधील शाळेने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाने खळबळ

महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.