दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात करोना फैलाव अद्यापही थांबलेला नाही. देश लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अशा चिंताजनक वातावरणात एक एक दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत ११ हजार ७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०७४ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जवळपास २७.५ टक्के लोकांनी करोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान, देशात २ हजार ५५३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४२,५३३ वर पोहचली आहे. ”कोरोना हा महामारीचा आजार ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात काही व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात वावरताना सोशल डिस्टसिंगचं भान ठेवलं गेलं नाही, तर करोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा प्रचंड वाढण्याचा धोका आहे,” अशी भीतीही अग्रवाल यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा तसंच गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, असंही आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना आवाहन केलं. राज्यांदरम्यान कार्गो सेवेदरम्यान अडथळा येऊ ने यासाठी गृह मंत्रालयाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. गृह मंत्रालयाचा कंट्रोल रुम नंबर १९३० आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हेल्पलाईन क्रमांक १०३३ याचा वापर करून चालक आणि ट्रान्सपोर्टर्स लॉकडाऊन संबंधित आपल्या तक्रारींवर समाधान मिळवू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment