देशव्यापी संपामुळे SBI, PNB सहित इतर बँकेच्या सेवा प्रभावित, अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपाला आज, 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज असोसिएशन (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यासह अनेक बँक संघटनांनी आज आणि उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही दिवशी सभासद संपावर जाणार असल्याचे युनियनने म्हटले आहे.

“AIBEA ने या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्रातील मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे,” युनियनने सांगितले. सरकारने खाजगीकरण थांबवावे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकट करण्यासाठी पावले उचलावीत, अशी बँक संघटनांची मागणी असल्याचे युनियनने म्हटले आहे.

खाजगीकरणाची मागणी
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की,” संपामुळे त्यांच्या बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.” एसबीआयने म्हटले आहे की, “आम्ही सल्ला देतो की बँकेने संपाच्या दिवसांमध्ये आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सामान्यपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली आहे. असे असतानाही संपामुळे आमच्या बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.”

प्रमुख बँकांना याचा फटका बसला
त्याचप्रमाणे, दुसरी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने सांगितले की,”आज भारत बंदच्या दरम्यान त्यांच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो.” PNB म्हणाले, “मात्र, बँकेने आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सामान्यपणे चालावे यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. संपामुळे आमच्या बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.”

बँकेचे काम रखडले
साप्ताहिक सुट्टीमुळे बँका आधीच 2 दिवस बंद होत्या. या संपामुळे लोकांच्या अडचणीही या कारणाने वाढणार आहेत. 26 मार्च हा महिन्याचा चौथा शनिवार होता, तर 27 मार्च हा रविवार होता. त्यामुळे सलग 2 दिवस बँका आधीच बंद होत्या. आता संपामुळे सोमवार (28 मार्च) आणि मंगळवारी (29 मार्च) बँका बंद राहणार आहेत. अशाप्रकारे सलग 4 दिवस देशातील बँकिंगचे कामकाज ठप्प होणार आहे.

Leave a Comment