अमरावती प्रतिनिधी | शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धडक मारली. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या धक्कादायक पराभव केल्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच सुनील भालेराव यांनीदेखील राणा यांच्या विरोधात नागपूर खंडपीठत याचिका दाखल केली आहे. या दोन याचिकेमुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी जाणार काय असा सवाल जनसामन्यातून विचारला जात आहे.
पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती ; अण्णांची सीबीआय कोर्टात साक्ष
नवनीत राणा या मूळच्या पंजाब राज्यातील आहेत. अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या सोबत त्यांचा विवाह झाल्याने त्या अमरावतीच्या नागरिक झाल्या. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर नथांबता निरंतर लोकांची कामे केली. त्यामुळेच त्यांना यावेळी लोकांनी लोकसभेत जाण्याची संधी दिली. मात्र त्यांच्या निवडीवर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी
नवनीत राणा यांची जात लुभाणा हि आहे. त्यांची जात हि अनुसूचित जातीसाठी पात्रजात नाही. तरी देखील नवनीत राणा या निवडणूक लढल्या आणि जिंकल्या असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी या विरोधात न्यायालयात न्याय मागितला आहे. त्यामुळे आता न्यायालायाच्या निर्णयावरच नवनीत राणा यांच्या खासदारकीचे भवितव्य निर्भर आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या जातीवर आक्षेप घेणारी एक याचिका या आधीही आनंदराव अडसूळ यांनी अमरावती सत्र न्यायायात दाखल केली आहे. त्या खटल्यात योगगुरू रामदेव बाबा आणि नवनीत राणा ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेचे तत्कालीन मुख्यध्यापक यांना साक्ष देण्यास आमंत्रित केले होते.
नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो
वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आमचा whatsaap ग्रुप आजच जॉईन करा. तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा
whatsaap ग्रुपची लिंक : http://bit.ly/2G3bX3J
फेसबुक पेजची लिंक : http://bit.ly/32fQu19
हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा
माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!
नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी
राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे
अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले
हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा
मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले
आहो म्हणून तर ” मोदी ची ” भेट घेतली