Tuesday, October 4, 2022

लव्ह जिहाद प्रकरणावरून नवनीत राणा आक्रमक; पोलिसांशीच घातली हुज्जत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथील एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याची घटना समोर आल्यांनतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनतर नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोपहि त्यांनी केला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

नवनीत राणा म्हणाल्या, सदर मुलीच्या पतीने तिला लग्नानंतर डांबून ठेवले आहे अशी तक्रार मुलीच्या आईवडिलांनी माझ्याकडे केली. त्यांनतर मी पोलिसाना फोन केला असतं त्यांनी माझा कॉल रेकॉर्डिंग केला. माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल करत नवनीत राणा यांनी थेट पोलिसांशीच हुज्जत घातली. तसेच दोन तासांत मुलीचा शोध घ्या असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.

या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावतीची बदनामी होत आहे. पूर्ण अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मुलाला पकडून आणलं आहे. रात्रीपासून पोलीस त्याची चौकशी करत आहेत, मात्र तरीही ती मुलगी अजून कशी काय सापडली नाही असा सवाल नवनीत राणा यांनी पोलिसांना केला.

 

Follow Us

हॅलो महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Related Articles

Latest Articles