हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मुंबईत दाखल झाले असून मातोश्रीबाहेर शिवसैनिकानी गर्दी केली आहे. तसेच ज्या खार येथील घरात राणा दाम्पत्य सध्या राहिलेले आहेत तिथेही शिवसैनिकांनी वेढा घातला आहे. या एकूण सर्व परिस्थितीनंतर राणा दाम्पत्याने फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत आज आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच असा इशारा दिला आहे.
आजचा शनिवारचा दिवस हा बजरंगबलीचा दिवस आहे. त्यामुळे हनुमान आणि प्रभु रामचंद्र यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही हनुमान चालीसा पठण करणार आहोत. ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि महाराष्ट्राच्या शांतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून राज्याला जो शनी लागलाय तो आम्हाला या ठिकाणी संपवायचा आहे अशी टीका राणा दाम्पत्याने केली.
यावेळी त्यांनी मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिकांवर देखील जोरदार टीका केली. हे शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे नाहीत कारण तस असत तर आज आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. मात्र मराठी माणसाला हनुमान चालीसा वाचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत अस रवी राणा म्हणाले.