हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य मुंबईतही पोचले होते. आता मात्र राणा दाम्पत्याने थेट माघार घेत आपलं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या २४ तारखेला मुंबई दौरा करणार आहेत. मोदीजी आपल्या देशाचा गौरव आहेत, त्यामुळे त्यांच्या मुंबई दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून आपण मातोश्रीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे रवी राणा यांनी म्हंटल. आमच्यावर कोणाचा दबाव नाही, आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी संगीतले
दरम्यान, आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चाळीस पठण करणार होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येव्हडच नव्हे तर राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाला शिवसैनिकांनी वेढा घातला होता. या संपूर्ण प्रकरणावरून मुंबईत वातावरण चिघळले होते. अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माघार घेतल्याची घोषणा केली आहे