हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. या दरम्यान आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. “विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपचा नक्कीच विजय होणार आहे. मुंबई नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेने विरोधात प्रचारात उतरणार असल्याचा इशारा राणा यांनी यावेळी दिला.
मुंबईत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आज फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलल्यावर असे जाणवले कि विधान परिषद निवडणुकीत भाजपला 100 टक्के यश हे मिळणारच आहे. आणि शिवसेनेचे 50 टक्के मते हेही भाजपला मिळतोय यात काही शंका नाही.
यावेळी नवनीत राणा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून केली जात असलेल्या चौकशीबाबत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, संविधानाने प्रत्येकाला आपापला अधिकार दिला आहे. एक लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिक म्हणून केल्या जात असलेल्या चौकशीला व विचारल्या जात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे हे आपले कर्तव्य आहे, असे राणा यांनी म्हंटले.
ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सुखाची भाकरीही नाही
यावेळी रवी राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका आलेली. घरात बसून शेतकऱ्यांच्या व्यथा उद्धव ठाकरे यांना काय कळणार आहे? खरं तर ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सुखाची भाकरीही खाता वाईट नाही, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.