हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर पलटवार केला. सोमय्या यांनी आधी स्वतःच्या मुलाकडे बघावं असा टोला त्यांनी लगावला.
‘मला वाटतंय सोमय्या यांना कोणी गंभीर घेत नाहीत, स्वतःचा आवाका निर्माण करून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणे या प्रकारचा उद्योग सोमय्यांचा आहे. इतराच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वतःची मुलं काय करतं आहेत, याकडे लक्ष द्यावं. मुलगा कोणाला फोन करतो? कोणाकडून पैसे मागतो? त्याच्या किती बोगस कंपन्यात आहेत? कसे मनी लाँड्रिंग ते करत आहेत? हे लोकांना माहित आहेत. याआधी नारायण राणे यांच्यावर सोमय्या बोट दाखवत होते. त्यांनी मनी लाँड्रिंग केली होती, आता याबाबत सोमय्या गप्प का?,’ असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
राजकीय हेतूने सरकारला बदनाम करण्यासाठी वारंवार त्या पद्धतीने बोलतं राहतायत. आताच्या आरोपात काही तथ्य नाही. मागच्या काळात जे काही आरोप लावले आहेत, त्याच्यातून लोकं दोषमुक्त होत आहेत. सरकारचा वापर करून भुजबळ यांना अटक केली होती आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पण शेवटी सत्यमेव जयते. सत्य काय आहे ते समोर आलं आणि ते अखेर दोषमुक्त झाले आहे.’