हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे
ईडीने २३ फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
Dawood Ibrahim money laundering case | Special PMLA court extends judicial custody of Maharashtra Minister Nawab Malik till 18th April pic.twitter.com/BzzYKTT03v
— ANI (@ANI) April 4, 2022
दरम्यान, नवाब मलिक यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मलिक यांचा राजीनामा घेतला नसला तरी मात्र मलिक यांच्याकडील सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेस ने काढून घेतली आहे.