हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिकांच्या घरावर आज सकाळी ईडीचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी मलिक यांना ताब्यात घेत त्यांची सुरुवातीला सात तास चौकशीही केली. दरम्यान मलिक यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता युक्तिवादा वेळी मलिक यांनी सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीने ईडी कार्यालयात आणण्यात आले असून कार्यालयात नेण्यात आल्यानंतर समन्सवर सही घेतली, असे मलिक यांनी म्हंटले.
नवाब मलिक यांना आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्या कारवाई प्रकरणी मुंबईतील सेन्शन कोर्टात वकिलांमध्ये युक्तिवाद सुरु आहे. यावेळी मलिक यांनी माझ्यावर करण्यात आलेली कारवाई कोणत्या अधिकाराखाली करण्यात आली. याची माहितीही दिली नाही, असे म्हटले. ईडीने ताब्यात घेण्यापूर्वी कोणतेही समन्स मला दिलेले नाही.
मला आज ईडीच्यावतीने जबरदस्ती नेऊन अटक दाखवली आहे. कोणत्या अधिकाराखाली मला अटक केली गेली आहे? असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ईडीने मला समन्स देऊन बोलवायला हवे होते, असे मलिक यांनी यावेळी म्हंटले.