नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; दरेकरांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केलीय.

नवाब मलिक यांनी आज हाजी अराफत शेख आणि मुन्ना यादव यांचं नाव घेतलं. माझा त्यांना सवाल आहे की हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता का? काल जो देवेंद्र फडणवीस यांनी जो स्फोट केला आहे त्यातून ते अजूनही सावरलेले दिसत नाही. कारण त्यांचे 1993 मधल्या आरोपी सोबतचे संबंध आता समोर आलेले आहेत, असं दरेकर म्हणालेत.

ते पुढे म्हणाले, नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी मानसोपचार तज्ञ कडे जाऊन उपचार करावेत.  कुठल्याही प्रकारची कागदपत्रे  सादर न करता पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणं अशा प्रकारचं काम नवाब मलिक करत आहेत, असंही दरेकर यांनी म्हंटल.