हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजकीय लेखिका प्रियम गांधी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणूकी नंतर राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करणार होते असा धक्कादायक खुलासा या पुस्तकातून करण्यात आला आहे. परंतु भाजप नेते नवाब मलिक यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. हे पुस्तक पूर्णपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका होती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिक यांनी ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर जोरदार टीका केली आहे. हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं लिहिलं गेलं आहे. त्यांनी सांगितलं त्यानुसारच हे पुस्तक लिहीण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचीच शरद पवार यांची भूमिका होती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांनी बेईमानीनं सरकार बनवलं त्यांची बाजू यात मांडण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कृत्यामुळे प्रतिमा मलिन झाली आहे. ती स्वच्छ करण्यासाठीच हे पुस्तक लिहिण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत न जाण्याचाच निर्णय झाला होता. भाजप नेतेच राष्ट्रवादीला संपर्क करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होते, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
काय लिहिलं आहे पुस्तकात
मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेत्यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं त्यांनी फडणवीसांना सांगितले, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने अमित शहांसोबत चर्चा केली, दुसऱ्याच दिवशी दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक झाली, परंतु नंतर राष्ट्रवादीचा बडा नेता फडणवीसांच्या कार्यालयात जातो आणि ‘पवारांनी आपली भूमिका बदलली असल्याचं’ सांगतो. ‘या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील ही शक्यता फार धुसर आहे. पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचं बरंच वय झालंय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचं पर्व आहे,’ असं हा बडा नेता फडणवीसांना सांगतो.
‘पवारांना आपली प्रतिष्ठा जपायची आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व राजकीय मित्राला दिलेला शब्द पाळला तरच पवारसाहेबांची प्रतिष्ठा टिकू शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेल पक्ष उत्सुक आहे.’असं या पुस्तकात लिहिण्यात आलं आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’