हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती समोर येत असतानाच आता अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांसहित तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्ती आमदारांविषयी चर्चा केली असून ती चर्चा सकारात्मक झाली आहे. राज्यपाल लवकरच याबाबत निर्णय घेतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याच्या बातम्या समोर येत होत्या, मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. राज्यपाल लवकर निर्णय घेतील. तसेच त्यांच्या अधिक काही सूचना असतील तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला असून राज्यपालांना काही आक्षेप असेल तर मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करतील आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.