हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वैद्यकीय कारणांसाठी तुरुंगातून बाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली. मुख्य म्हणजे, सभागृहात कामकाज सुरू असताना नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यात शेवटच्या भागावर जाऊन बसले. त्यामुळे मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी केलेल्या या कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे
राज्यामध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनामध्ये नवाब मलिक सहभागी होणार का नाही त्याबाबत चर्चा रंगली असताना त्यांनी आज अधिवेशनात हजेरी लावल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसायला गेल्याचे पाहिला मिळाले आहे. त्यामुळे आता नवाब मलिक अजित पवार गटारास पाठिंबा दर्शवतील हे सिद्ध झाले आहे.
दरम्यान, नवाब मलिक तुरुंगाच्या बाहेर आल्यापासून ते अजित पवार गटात जाणार की शरद पवार गटात जाणार असा प्रश्न उपस्थित राहिला होता. परंतु अशावेळी नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका न मांडता तठस्थ राहण्यास जास्त पसंती दाखवली. परंतु आता त्यांनी आजच्या अधिवेशनामध्ये अप्रत्यक्षपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे याचा धक्का शरद पवार गटाला देखील बसला आहे.