महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिल पर्यंत वाढ केली आहे.
यापूर्वी नवाब मलिक यांना 21 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून मलिकांचा पाय आणखी खोलात गेला आहे. दरम्यान, कोर्टाकडून खुर्ची, बेड चटई वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने केलेल्या अटक केली होती. त्यांच्यावरती अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी पैशांचा व्यवहार केल्याच्या आरोपांवरुन त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ने मलिक यांचा राजीनामा घेतला नसला तरी त्यांच्या जवळची सर्व खाती काढण्यात आली आहेत. त्यामुळे मलिक बिन खात्याचे मंत्री राहिले आहेत