हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती दंगली वरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आमदार अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. भाजप सरकारच्या काळात एकही दंगल घडत नाही परंतु विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी दंगल घडते हि वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती असल्याचे अनिल बोंडे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडिओमध्ये अनिल बोंडे म्हणाले की, गोधरा हत्याकांडनंतर गुजरातमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही. तसेच अहमदाबादमध्ये दरवर्षी आंदोलन, हिंसाचार व्हायचा परंतु मोदी सरकार आल्यानंतर एकाही दंगलीची घटना घडली नाही. योगी सरकारच्या काळातही पाहिले तर एकही दंगलीच्या घटनेची नोंद नाही. महाराष्ट्रातही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ५ वर्षांत एकही दंगल घडली नाही.
Listen to this BJP MLA from Amravati
झूठ बोले कौआ काटे… pic.twitter.com/7ch15MREqz— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
भाजपची सत्ता जेव्हा असते तेव्हा ते असल्या दंगल, हिंसाचारच्या घटनांना सामाजात प्राधान्य देत नाहीत. परंतु मविआ सरकार, काँग्रेस सरकार किंवा डाव्या सरकारच्या काळात अशा घटना घडत असतात कारण त्यांना माहिती असते की आपल्याला नेत्यांचे संरक्षण आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे संगळ्यांना माहिती आहे. कारण मागील ५ वर्षांत पाहिले तर महाराष्ट्रात संवेदनशील भागात एकही दंगल झाली नाही असे अनिल बोंडे यांनी सागितले आहे.
पैशांबद्दल बोलायचे झाले तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम अवैध धंद्यात आहेत. मग ते ड्रग्ज पेडलर, वाळू माफिया, गुटखा माफिया आणि वेगळ्या प्रवाहातून पैसा येतो हा पैसा हिंसाचार आणि दंगल घडवण्यासाठी वापरण्यात येतो. विशेषता मस्जिदच्या माध्यमातून पैसा वापरण्यात येतो. असे अनिल बोंडे म्हणाले आहेत.