गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदान प्रक्रीय संपवून मघारी येत असलेल्या निवडणुक पथकावर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी लावलेल्या भुसुरुंगात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्नालयात हलवण्यात आले आहे.
Maharashtra: Two security personnel have been injured in an IED blast and firing by naxals in Etapalli of Gadchiroli district when they were returning to the base camp along with the polling party today. The injured jawans are being brought to Nagpur.
— ANI (@ANI) April 11, 2019
नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचा हल्ला परतवून लावला. त्यामुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत मतदान केंद्रांना टार्गेट करण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.
चार वाजण्याच्या सुमारास धानोरा तालुक्यातील तुमरीकसा गावाजवळ नक्षलवाद्यांनी ११३ जवानांच्या सीआरपीएफ बटालियनवर गोळीबार केला होता. मात्र सीआरपीएफ च्या जवानांनी प्रत्युत्तर देताच नक्षल्यांनी तेथून पळ काढला.