नवी दिल्ली । बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा दक्षता तपास (Vigilance) जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीतील आयर्न खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि समीर वानखेडे या तिघांच्या चौकशीची शेवटची फेरी होणार आहे.
आशिष रंजन यांना 11 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या दिल्लीत दक्षता तपासाला सामोरे जावे लागणार आहे. हि त्यांची तिसरी चौकशी आहे. तर दुसरीकडे, व्हीव्ही सिंग यांना 12 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा दक्षता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षता पथक 13 फेब्रुवारीला समीर वानखेडेची तिसऱ्यांदा चौकशी करणार आहे. या प्रकरणी दक्षता पथकाकडून आतापर्यंत केवळ किरण गोसावी यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्याच्या गावात पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.
या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाचे प्रमुख आणि डीडीजी एनआर ज्ञानेश्वर सिंह करत आहेत, जे तीन वेळा मुंबईत जाऊन अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचबरोबर घटनेशी संबंधित घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचाही या प्रकरणात बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.