हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली. तसेच त्यांनी एनसीबी वर गंभीर आरोप केले होते. यानंतर एनसीबी ने पत्रकार परिषद घेत नवाब यांचे आरोप फेटाळले आहेत.
त्या दिवशी एकूण 14 लोकांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं होतं. सर्वांना कलम 67 अंतर्गत नोटीस देण्यात आली. ताब्यात घेतलेल्या 14 जणांपैकी आठ जणांना पुरव्याच्या आधारावर अटक करण्यात आलं. तर सहा जाणांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आलं. असे एनसीबी ने स्पष्ट केले.
एनसीबीवर करण्यात आलेले सर्व आरोप विनाधार आणि पूर्वग्रहदुषित आहेत. अनेक विधानं ही केवळ गृहितकांवर आधारित आहेत. एनसीबीची कारवाई आणि त्यासाठीच्या प्रक्रिया या कायद्याला धरुन आणि पारदर्शक आहेत आणि असतील. एनसीबी एक निष्पक्ष संस्था आहे. ही संस्था देशाला नशामुक्त करण्यासाठी काम करत आहे. लोकांकडून मिळालेली आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीवर आम्ही काम करतो, असंही त्यांनी सांगितलं.