राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केला ‘हा’ सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे ग्रामीण विभागात येणाऱ्या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर NCP च्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. या संदर्भातला एक व्हीडिओच चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार वर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटल की, हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे ! पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झालीय !

मारहाण करणारा कोण? तर तो आहे @NCPspeaks चा !…..गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ?? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

याप्रकरणी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानशिलात लगावली, असा आरोप महिला सरपंचाने पोलीस तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे

Leave a Comment