पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विचार करण्यासाठी सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके यांच्या गटाने आज आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये उसाचे बिल (sugarcane bill) मागितले म्हणून एका शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
या शेतकऱ्याच्या अंगावर व्यासपीठावरील कार्यकर्ते अंगावर धावून गेले आणि त्याला धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पंढरपुरातील रात्री दाते मंगल कार्यालयात श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद यांची निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती.
उसाचे बिल मागितले म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शेतकऱ्याला धक्काबुक्की pic.twitter.com/mTqg4h9lBD
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 3, 2022
या बैठकीदरम्यान रोपळे येथील शेतकरी जगन भोसले यांनी माईक वर येऊन आपण अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे उसाचे बिल (sugarcane bill) द्यावे अशी मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत मला उसाचे बिल (sugarcane bill) मिळाले नाही तर अनेक भाषणं केली पण याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. अशी व्यथा त्याने मांडली असता, चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी जगन भोसले यांना व्यासपीठावर जाऊन धक्काबुक्की केली. श्री विठ्ठल साखर कारखानाच्या प्रमुख लोकांसमोरच राडा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका