हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच आता सर्वसामान्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील 18 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले. रेमडेसिविर आणि करोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा पुरवठा कमी करू नये असंही त्यांनी म्हटलं. पुण्यात हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याचा विचार सुरु आहे.”
1 मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका काय आहे, ते सांगतील. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू”, अस ते यावेळी म्हणाले.