हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर देत नानांचे हे विधान हास्यास्पद आहे अस म्हंटल आहे. तसेच नाना कोणत्या पक्षातून काँग्रेस मध्ये आले अस म्हणत त्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, नाना पटोले यांचे ते विधान हास्यास्पद आहे. कारण नानाच कोणत्या पक्षातून काँग्रेस मध्ये गेले हे आपल्याला माहीत आहे. ते स्वतः पाठीमागे भाजपमध्ये होते, मग भाजपने म्हणायचं का की नाना पटोलेंनी पाठीत खंजीर खुपसला. अस म्हणत हेडलाईन मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसल हे वाक्य त्यांना बर वाटत असेल पण संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असत अस अजित पवार यांनी म्हंटल.
राज्य स्तरावर आणि देशपातळीवरील निर्णय हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते घेत असतात. जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. तेथील राजकीय परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, किंवा वातावरण योग्य राहण्यासाठी आघाडीतील नेत्यांमध्ये समनव्य असेल तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले.